चंद्रिका (लघुकथा)

चंद्रिका (लघुकथा)

चंद्रिका – लघुकथा राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती. “कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं…

Read More Read More

भोवरा (लघुकथा)

भोवरा (लघुकथा)

आयुष्य हा एक पाण्याच्या प्रवाहातला फसवा भोवरा झालंय. वरवर पाहताक्षणी वाटतं की, सगळं ठीक आहे, पाणी खळाखळा वाहतंय, पण तास काहीच नसतं. तसं वाटणं हा केवळ आभास असतो. एक प्रश्न सोडवला की दुसरा , तो सुटला की तिसरा अशी प्रश्नांची मालिका तयारच असते तुमच्या मनाचा आणि बुद्धीचा भुगा करायला! बरं, ही प्रश्नांची एकसंध मालिका नसून साराच गुंता असतो. ह्या समस्या सोडवता सोडवता माणूस ह्या चक्रात असा फसतो की सुटका करून घेणं निव्वळ अशक्य! तो सुटण्याची जेवढी अधिक धडपड करेल तितका…

Read More Read More

ती निघाली – द्विशतशब्दकथा

ती निघाली – द्विशतशब्दकथा

ती निघाली – द्विशतशब्दकथा ——————————————————————————————— त्या विशिष्ट वेळी घाईघाईने एका प्रवासाचा आरंभ करण्यास ती निघाली. ह्या प्रवासाच्या प्रत्येक पल्ल्यावर संघर्ष करावा लागतो हे माहित असूनही ती जाण्यास निघाली. शेवटी काहीही झाले तरी आयुष्यात कर्तव्यपूर्ती महत्वाची हे जाणून ती निघाली. पहिला टप्पा कुठलेही विघ्न न येता सुरळीत पार पडला. दुसऱ्या टप्प्यावर सुरु झाला संघर्ष!! हो संघर्षच तो! तिच्यासारख्याच सैनिकांचा जमाव तिला आडवा आला. एकेकाला चपळाईने झपाट्याने मागे टाकत ती निघाली. पुढच्या टप्प्यावर निसर्गाची अवकृपा सहन करावी लागली. पण संरक्षक कवच आणखी…

Read More Read More

ब्रेक – अप (शतशब्दकथा)

ब्रेक – अप (शतशब्दकथा)

ब्रेक – अप (शतशब्दकथा) आज तिने हे जीवाभावाचं नातं तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. मनावर दगड ठेवून आयुष्यात पुन्हा कधी त्याचं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं. खूप प्रेम केलं तिने त्याच्यावर. इतकं की त्याच्या सहवासाशिवाय तिला करमायचंच नाही. सतत त्याचाच विचार, त्याची भेट कशी होईल हा ध्यास, त्याची सुखद भेट होऊन गेल्यांनतरही आठवणींच्या सुगंधी विचारांमध्ये हरवून जाणे, हेच तिचे विश्व बनले होते. त्याच्या केवळ सोबत असण्याने सगळी tensions दूर पळत असत. विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत…

Read More Read More

उपेक्षित (शतशब्दलेख)

उपेक्षित (शतशब्दलेख)

१०० शब्दांचा लेख अशी श्रेणी असती तर हा लेख तिथे टाकला असता. तूर्तास, एक प्रयोग समजून गोड मानून घ्या. ————————————————————————————– अगदी वाजत गाजत तिचे आगमन होते, तिच्या येण्याची वार्ता सहज सर्वांना समजते. पण तरीही ती दुर्लक्षित! लक्षवेधक असलेली ती आपल्या अस्तित्वाची जाणीव वारंवार करून देत असते. बरं, ती एकटीच येते असंही नाही, सखे, सवंगडी बरोबर घेऊनच येते. भविष्यात घडू पाहणाऱ्या महत्वाच्या घटनांमध्ये तिचा मोठा वाटा असणार हे माहित असूनही लोक तिला उपेक्षित ठेवतात. तिच्या येण्याविषयी नाना तर्कवितर्क लढवले जातात. ती…

Read More Read More